Tarun Bharat

चैतन्यमय वातावरणात निघाली दौड

टिळकवाडीतील शिवाजी कॉलनी येथून दुसऱया दिवशीच्या दौडला प्रारंभ : शहर परिसर भगवेमय

प्रतिनिधी /बेळगाव

असंघटित असलेल्या हिंदूंना एकत्रित करून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने काढण्यात येणारी दौड यावषी कोरोना नियमावलीनुसारच केली जात आहे. दौडच्या दुसऱया दिवशीही चैतन्यमय वातावरणात दुर्गामातेचा जागर करत दौड काढण्यात आली. प्रातिनिधीक स्वरुपात धारकरी सहभागी झाले असले तरी ठिकठिकाणी उत्साहाने दौडीचे स्वागत करण्यात आले. दौडमुळे शहर परिसर पुन्हा एकदा भगवेमय झाला आहे.

दुसऱया दिवशीच्या दौडला टिळकवाडी येथील शिवाजी कॉलनी येथून प्रारंभ झाला. उद्यमबाग पोलीस स्थानकाचे निरीक्षक धीरज शिंदे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. सागर भोसले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी पवन कांबळे, श्रीकांत पाटील, प्रशांत पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘देशासाठी जगायचं रं, शिवबानं सांगावा धाडलाय रं’ अशी प्रेरणादायी गीते गात दौडला प्रारंभ झाला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करत दौडचे स्वागत केले. कोरोना नियमावलीनुसार 15 धारकऱयांच्या उपस्थितीत दौड काढण्यात आली. पहिले रेल्वेगेट, देशमुख रोड, आरपीडी चौक, खानापूर रोड, अनगोळ रोड, धर्मवीर संभाजी चौक येथून अनगोळच्या महालक्ष्मी मंदिरात दौडची सांगता झाली.

शिवभक्तांची गर्दी

खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी ए. चंद्राप्पा व मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्राने दुसऱया दिवशीच्या दौडची सांगता झाली. दौडमध्ये गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ नये, याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळेच जागोजागी पोलीस उभे करण्यात आले होते. दौडमध्ये सहभागी होता आले नाही तरी ती पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

शिवप्रभू दौडीतील विजेत्यांना ध्वज धरण्याचा मान…

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गडकोट मोहिमेवेळी शिवप्रभू दौडचे आयोजन केले होते. मोहिमेमध्ये सहभागी होणाऱया धारकऱयांमधून निवडक धावपटू यामध्ये सहभागी होत असतात. यामध्ये विजयी ठरलेल्या धारकऱयांना यावषी ध्वज धरण्याचा मान दिला जात आहे. पहिल्या दिवशी ताशिलदार गल्ली येथील प्रदीप अष्टेकर यांना तर दुसऱया दिवशी धामणे येथील सचिन बाळेकुंद्री यांना ध्वज धरण्याचा मान देण्यात आला. उर्वरित धारकऱयांनाही पुढील काळात ध्वज धरण्याचा मान दिला जाणार आहे.

Related Stories

खंजर गल्ली येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Amit Kulkarni

इतरांच्या आयुष्यात स्मरणीय क्षण दिल्याचे समाधान

Patil_p

पूरग्रस्त लाभार्थींना हक्कपत्र द्या!

Patil_p

कोरेगल्ली-जेडगल्ली कॉर्नर रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

मराठीतून परिपत्रके देण्याची मागणी

Amit Kulkarni

न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni