Tarun Bharat

चैतन्यमय वातावरणात पार पडली दौड

नेहरुनगर येथील बसवाण्णा महादेव मंदिरापासून सुरुवात : ठिकठिकाणी महिलांकडून स्वागत-औक्षण

प्रतिनिधी / बेळगाव

पहाटे उठून ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर करत बेळगावमधून धार्मिक स्थळांना भेटी देत युवकांवर धर्मसंस्कार करण्याचा प्रयत्न दुर्गामाता दौडच्या माध्यमातून होतो. दौडमधील चैतन्यमय वातावरणामुळे धारकऱयांमध्ये वीरश्री संचारत असते. या नऊ दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश हा वर्षभर योग्य दिशा दाखवत जातो. अशीच ऊर्जा घेऊन यावषी निर्बंध असतानाही दौड काढण्यात येत आहे. तिसऱया दिवशीच्या दौडमध्ये हाच उत्साह व चैतन्यमय वातावरण पहायला मिळाले.

तिसऱया दिवशीच्या दौडला नेहरुनगर येथील बसवाण्णा महादेव मंदिरापासून सुरुवात झाली. मंदिराचे संचालक शहाजी ठक यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला.  प्रेरणा मंत्र व आरतीने दौडला सुरुवात झाली. ठिकठिकाणी महिलांकडून ध्वजाचे स्वागत करून औक्षण करण्यात येत होते. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार केवळ सहा धारकरी दौडमध्ये सहभागी झाले होते.

नेहरुनगर, हॉटेल रामदेव कॉर्नर, गँगवाडीमार्गे शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात दौडची सांगता झाली. मंदिराच्यावतीने दौडचे स्वागत करण्यात आले. पुजारी लक्ष्मण गुणी यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्राने तिसऱया दिवशीच्या दौडची सांगता झाली.

ध्वज चढविण्याने धन्य पावलो

बेळगावमध्ये दौड सुरू झाल्यापासून आम्ही दौडमध्ये सहभागी होत आहोत. यावषी कोरोनामुळे अनेक निर्बंध आले आहेत. परंतु परंपरा खंडित न करता निवडक धारकऱयांच्या उपस्थितीत यावषीही दौड सुरू ठेवण्यात आली आहे. यावषी ध्वज चढविण्याचा मान मला मिळाल्याने धन्य झाल्याचे बसवाण्णा महादेव मंदिराचे संचालक शहाजी ठक यांनी सांगितले.

युवकांमधील उत्साह मात्र कायम

दरवषी हजारोंच्या संख्येने युवक-युवती दौडमध्ये सहभागी होत असतात. या दौडमधील प्रेरणादायी वातावरणामुळे तंदुरुस्त युवा पिढी घडविण्याचा प्रयत्न भिडे गुरुजी करीत आहेत. यावषी निर्बंध असले तरी युवकांमधील उत्साह मात्र कायम असल्याचे जोतिबा मंदिराचे पुजारी लक्ष्मण गुणी यांनी सांगितले.

बुधवार दि. 21 रोजीचा दौडचा मार्ग…

मिलिटरी महादेव मंदिर येथील शिवतीर्थपासून बुधवार दि. 21 रोजीच्या दौडला प्रारंभ होणार आहे. काँग्रेस रोडमार्गे गोगटे सर्कल, खानापूर रोड, संचयनी सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली येथून संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरात दौडची सांगता होणार आहे.   

Related Stories

कर्नाटक राज्य ऑनलाईन योगासन स्पर्धा 11 पासून

Amit Kulkarni

वाहून जाणाऱयाचा जीव वाचविणाऱया कार्लेकरचा किरण जाधवनी केला सन्मान

Amit Kulkarni

जात-उत्पन्न दाखल्याच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

कागवाडमध्ये 39 गुंठय़ात 120 टन उसाचे उत्पादन

Patil_p

औद्योगिक वसाहत सुरू करण्यास सशर्त परवानगी

Patil_p

कोरोनामुळे महिलेसह चौघेजण दगावले

Amit Kulkarni