Tarun Bharat

चोरीला गेलेले 7 लाखांचे दागिने, 1.80 लाखांची रोकड फिर्यादींना सुपूर्त

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारच्या झालेल्या गुन्ह्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चोरीस गेलेले 7 लाख रुपयांचे दागिने, 1 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम फिर्यादींना सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बोऱ्हाडे म्हणाले, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी गेल्या होत्या. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले. शिवाजी साहेबराव चव्हाण (रा. खिंडवाडी, ता. सातारा), शोभा राजाराम कदम (रा. प्रतापसिंह नगर, सातारा), इंदुबाई आप्पा काळे (रा. विठ्ठलकृपा कॉलनी, देशमुख नगर, कृष्णानगर, सातारा) आणि अश्विनी अरविंद उदगीर (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, एन. व्ही रोड, चूनाभट्टी, मुंबई) अशी मुद्देमाल परत दिलेल्यांची नावे आहेत.

Related Stories

पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीमुळे मतदारांची होणार दिवाळी

Patil_p

पोवई नाक्यावरचा रस्ता खचला; बांधकाम विभागाकडून मलमपट्टी सुरु

Archana Banage

कराडची एकूण रूग्ण संख्या 35 हजारांवर

Amit Kulkarni

पन्हाळगडावर मस्ती करायला येताय..? मग तुमच्यासोबत आता ‘हे’ होऊ शकते..

Rahul Gadkar

जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुलेंचा दिल्लीत सन्मान

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 489 जण कोरोनाबाधित; तर 15 जणांचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!