Tarun Bharat

चोरी प्रकरणी तारिहाळ येथील चौकडीला अटक

Advertisements

हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई, 15 लाखांचा ऐवज जप्त

 प्रतिनिधी / बेळगाव

चोरी प्रकरणी तारिहाळ (ता. बेळगाव) येथील चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 14 लाख 69 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, ग्रामीण विभागाचे एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या चौकडीने हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक व मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन चोऱया केल्याची कबुली दिली आहे.

नागेंद्र उर्फ स्वामी तिप्पान्ना कोळीकोप्प (वय 23), जोतिबा उर्फ अंजू उर्फ अजय अप्पय्या तिप्पाई (वय 27), महेश प्रकाश खनगावकर (वय 21), मंजुनाथ अप्पय्या कोलेकर (वय 21, चौघेही रा. तारिहाळ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. सोमवारी त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी 14 लाख 69 हजार रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने, रोकड, गृहोपयोगी वस्तु, तीन मोटार सायकली जप्त केल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. मुत्नाळ, वाय. बी. हत्तरवाट, अरुण कांबळे, एस. एस. भांवी, जे. ए. पाटील, आर. एस. केळगीनमनी, एम. एस. मंटूर, एस. एम. अळ्ळळ्ळी, एस. एस. जगजंपी, ए. एच. अगशीमनी व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की आदींनी या कारवाईत भाग घेतला होता. पोलीस आयुक्तांनी या पथकाचे कौतुक केले आहे.

Related Stories

जुना महात्मा फुले रोड रुंदीकरणाचा आटापिटा

Patil_p

राजस्थान : न्यायाधीशानेच केला लैंगिक अत्याचार

Archana Banage

स्वांतत्र्यदिनानिमित्त होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा

Amit Kulkarni

टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली ग्रंथदिंडी

Patil_p

सातारा : कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला

Archana Banage

हरिप्रिया एक्स्प्रेस धावली इलेक्ट्रिक इंजिनवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!