Tarun Bharat

चोरी प्रकरणी पंढरपूर येथील त्रिकुटाला अटक

हरिहर पोलिसांची कारवाई, खानापूर, निपाणी, संकेश्वर येथेही चोरी केल्याचे उघड

प्रतिनिधी/ बेळगाव

खानापूर, निपाणी, संकेश्वरसह राज्यातील विविध ठिकाणी चोऱया, घरफोडय़ा केल्याच्या आरोपावरुन दावणगेरी जिह्यातील हरिहर पोलिसांनी पंढरपूर (जि. सोलापूर) येथील तिघा जणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून सुमारे 23 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दावणगेरीचे पोलीस प्रमुख सी. बी. रिष्यंत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. पंढरपूर येथील सचिन, सन्नी महेशकुमार तनेज, सागर कोळे या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. या त्रिकुटाने हरिहर, निपाणी, संकेश्वर, खानापूर, हावेरी, राणे बेन्नूर परिसरात दहा घरफोडय़ा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

त्यांच्या जवळून 16 लाख 84 हजार रुपये किमतीचे 421 ग्रॅम सोने, 2 लाख 16 हजार रुपये किमतीची 3 किलो 600 ग्रॅम चांदी, 1 लाख रुपये रोख, 7 हजार रुपये किमतीचे मनगटी घडय़ाळ, 2 लाख 85 हजार रुपये किमतीची स्वीप्ट कार असा एकूण 22 लाख 92 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

14 जानेवारी 2021 रोजी हरिहर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोरीचा प्रकार घडला होता. त्या पाठोपाठ या त्रिकुटाने हरिहर शहर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सलग दोन घरफोडय़ा केल्या. या गुन्हय़ांमागे आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक बसवराज बी. एस., व रुदेश यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक सतीशकुमार यु., पोलीस उपनिरीक्षक सुनील तेली, लता ताळेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

पंढरपूर येथील सचिन, सन्नी व सागर हे तिघे मित्र आहेत. हे सर्व जण 25 ते 30 वयोगटातील असून यापैकी एकाने तर तिसरीत शिकत असताना चोऱया करण्यास सुरूवात केली आहे. या टोळीतील गुन्हेगार प्रथमच पोलिसांच्या जाळय़ात अडकले आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून बेळगाव पोलिसांनाही या संबंधीची माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

महिला आघाडीतर्फे तिळगूळ समारंभ उत्साहात

Amit Kulkarni

कोरोना महामारीमुळे बुरुड समाज सापडला आर्थिक संकटात

Amit Kulkarni

आत्मभान सदैव जागे असणे हे खरे सौंदर्य!

Omkar B

आंबेवाडी भगतसिंग हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

Amit Kulkarni

दीपावली निमित्त शहरात 18 फुटाचा आकाश कंदील

mithun mane

आझमनगर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण नाही?

Patil_p