Tarun Bharat

चोरून दारुविक्री करणारा जगन्नाथ पवार ताब्यात

Advertisements

प्रतिनिधी/ गोडोली

लाँकडाऊन मध्ये चोरटी दारु विक्री चढय़ा दराने करणाया शाहुनगर येथील जगन्नाथ मारुती पवार (वय- 48) रा.कृष्ण बंगला,समर्थ काँलनी, प्लाँट नं.122 शाहुनगर, गोडोली याला तब्बल रु.3 लाख 3 हजार 306 किंमतीच्या मुद्देमालास ताब्यात घेतले.शहर पोलीसांना लाँकडाऊन मध्ये ही सातत्याने चोरटय़ा दारुविक्री विरोधात कारवाई कराव्या लागत आहेत.

व्यसन करणायांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे वैद्यकीय क्षेत्राने निदर्शनास आणून दिली आहे. लाँकडाऊन असताना दारु, व्यसनी पदार्थांचा चढय़ा दराने काळाबाजार चांगलाच वाढला आहे. लाँकडाऊन मध्ये कोरोना विरोधात लढताना पोलीसांच्यावर प्रचंड ताण असताना चोरटी दारु विक्री रोखण्यासाठी ही  दुर्दैवाने लढावे लागते.सातारा शहरात सातत्याने पोलीसांनी चोरटी दारूविक्री विरोधात अनेक कारवाई केल्या आहेत.

शाहूनगर येथील कृष्ण बंगला येथे जगन्नाथ पवार हा चोरटी दारु विक्री आणि दारुचा साठा केल्याची खबर  शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना मिळाली. तत्काळ त्यांनी शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या टीमला आदेश देऊन कारवाई करण्यास आदेश दिले.

शाहुनगर येथे  जगन्नाथ पवार याच्यासह दारुचा मोठा साठा आणि एक स्विप्ट गाडी असा तब्बल रु.3लाख,3हजार,306 किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक अविनाश चव्हाण, पो.शि.अभय साबळे ,शिवाजी भिसे,किशोर तारळकर,गणेश भोंग,विशाल धुमाळ, धीरज कुंभार, गणेश घाडगे हे कारवाईत सहभागी झाले होते.

Related Stories

…तर आताच अटक करा; संजय राऊतांचं चंद्रकांतदादांना आव्हान

Abhijeet Shinde

गोव्यातही ईडीचा धाक दाखवून फोडाफोडी

datta jadhav

कोयना धरणाची दारे पुन्हा उघडली ; सहा वक्र दरवाजे पाऊण फुटांवर

Abhijeet Shinde

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे हस्तातंरण नव्या इमारतीत व्हावे

Patil_p

विहिरीचा गाळ काढताना आढळली सतराव्या शतकातील शस्त्र

Patil_p

राजर्षींना संसदेचे अभिवादन

Sumit Tambekar
error: Content is protected !!