Tarun Bharat

चोर्ला घाटातील अवजड वाहतूक बेसुमारपणे सुरूच

गणेश देखावे पाहण्यासाठी बेळगावात जाणाऱया नारिकांच्या जीवाला धोका

प्रतिनिधी /वाळपई

गोवा-बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातून अवजड वाहतुकीला बंदी घातलेली आहे. यासंबंधी आदेश गेल्या एक वर्षापासून उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयानी दिलेला आहे. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या गणेश चतुर्थीच्या काळात या भागातून गोमंतकीय बेळगाव येथे गणेश देखावे पाहण्यासाठी जात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. यामुळे ही अवजड वाहतूक सरकारने ताबडतोब बंद करावी अशी मागणी गणेशभक्तांनी केलेली आहे.

गेल्या एक वर्षापासून गोवा बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातून प्रकारच्या वाहतुकीला उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी बंदी घातलेली आहे. यासंबंधी आदेश दोन महिन्यापूर्वी जारी केलेला आहे. मात्र याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक वाहतूक पोलीस यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. पावसाळी मोसमात सातत्याने याभागात अवजड वाहतुकीमुळे अपघात घडू लागले आहेत. याची दखल घेऊन ही अवजड वाहतूक बंद करावी अशा मागणी केली होती. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

अपघातामुळे प्रवाशांना धोका. सध्या चोर्ला घाट परिसरातील महामार्ग हा अपघातासाठी धोकादायक ठरू लागला आहे. अवजड प्रकारची वाहतूक वाढल्यामुळे हा धोका मोठय़ा प्रमाणात निर्माण होऊ लागलेला आहे. सध्या या महामार्गावर अवजड ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडल्यामुळे अपघात झालेला आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. यामुळे या महामार्गावरील अपघाताचा  प्रश्न ऐरणीवर आलेला आहे .यामुळे ताबडतोब यावर बंदी घालावी अशी मागणी प्रवासी वर्गाने केलेली आहे.

Related Stories

गोवावादी सरकारसाठी फातोर्डा फॉरवर्डच्या उमेदवारांना निवडून द्या

Amit Kulkarni

कला अकादमीच्या नो टेंडरिंग प्रक्रियेची तांत्रिक समिती तर्फे चौकशी करा

Amit Kulkarni

दिव्यांगांना सर्व सुविधा त्वरित मिळाव्या

Patil_p

कोरोनाची परिस्थिती जातेय हाताबाहेर

Amit Kulkarni

कचराप्रकरणी चार पंचायतींना उच्च न्यायालयाची चपराक

Amit Kulkarni

ज्याचे पाय भूमीवर तोच टीकतो रंगभूमीवर

Amit Kulkarni