Tarun Bharat

चोवीस तास पाणी योजनेचा प्रशासकांनी घेतला आढावा

जलकुंभासाठी लागणाऱया जागांचे हस्तांतर करण्याची सूचना : घरपट्टी जमा करून घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा

प्रतिनिधी / बेळगाव

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची माहिती घेऊन सदर कामाला कधीपासून सुरूवात होणार याचा आढावा एलऍन्डटी कंपनीच्या प्रतिनिधांकडून जिल्हाधिकाऱयांनी घेतला. पाण्याचा दर कमी असल्याची माहिती एलऍन्डटी कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली. पहिल्यांदा सुविधा द्या नंतर पाण्याचा दर पाहू. सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच नागरिक पैसे देवू शकतात, अशी सूचना अधिकाऱयांना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

मनपा प्रशासक जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पाणीपुरवठा योजनेची माहिती घेतली. तसेच चोवीस तास पाणीयोजनेच्या कामकाजाची माहिती एलऍन्डटी कंपनीच्या प्रतिनिधांकडून घेतली. तसेच जलकुंभ उभारणीकरिता लागणाऱया जागांचे हस्तांतर करण्याची सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे योजनेकरिता महापालिकेकडून चाळीस कोटीचा निधी जमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर रक्कम पाणीपुरवठा मंडळाकडे शिल्लक असल्याने ती रक्कम जागतिक बँकेच्या खात्यावर जमा करण्याची सूचना करण्यात आली. 

घरपट्टी चलन देण्यास टाळटाळ करण्यात येत असल्याची तक्रार होत आहे. नागरिक घरपट्टी भरण्यास स्वत: येत असताना चलन का दिले जात नाही. यासंदर्भात बोलताना तांत्रिक अडचण असल्याची माहिती महसूल उपायुक्त एस.बी.दोड्डगौडर यांनी दिली. पर्यायी उपाययोजना राबवून नागरिकांकडून घरपट्टी जमा करून घ्या अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. बैठकीला महापालिका आयुक्त जगदीश के. एच., पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंते व्ही.एल.चंद्राप्पा, पायाभूत सुविधा विभागाचे अधिकारी आणि एलऍन्ड टी कंपनीचे व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

राजहंसगड येथे अंगडी यांना श्रद्धांजली

Patil_p

जांबोटी ग्रा. पं. विकास अधिकाऱयाच्या बदलीसाठी सदस्यांचे ठिय्या आंदोलन

Amit Kulkarni

समर्थनगरमध्ये घरगुती गॅस सिंलिडरचा स्फोट; तीघे जखमी

Tousif Mujawar

नेहरुनगर येथे दोन महिन्यांपासून पाणीगळती

Amit Kulkarni

जिह्यात सव्वादोन लाखांवर स्वॅब तपासणी

Patil_p

राकसकोप जलाशय अद्यापही तुडुंबच

Amit Kulkarni