Tarun Bharat

चोवीस वर्षे फरार आरोपीस अटक करण्यात शिरोळ पोलीसांना यश

प्रतिनिधी / शिरोळ

गेल्या 24 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरारी आरोपीस जेरबंद करण्यात शिरोळ गुन्हे शोध पथकास यश संशयित आरोपीस जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दोनोळी ता. शिरोळ येथील फिर्यादी भुपाल उर्फ बबन विठ्ठल माने यांची रिक्षा संशयित आरोपी आसाराम उर्फ बंडू धोंडीबा माळी रा. पिंपळगाव कानडा ता. गेवराई जि. बीड यांच्या मुलीच्या पायावरून गेली होती यातूनच वाद झाला. संशयित आरोपी मारियाने माळी याने त्यांनी कोयत्याने माने यांच्या डोकीत व खांद्यावर वार करून गंभीर जखमी केला होता. ही घटना 1996 साली घडली होती  बंडू माळी हा आपल्या कुटुंबासह ऊस तोडणी मजुरी करण्यासाठी दानोळी येथे आला होता.  

घटना घडल्यापासून तो फरारी होता पोलिसांनी त्याचा शोध घेतला असतात कोठेही मिळून आला नाही  जिल्हा पोलीस प्रमुख यांनी पोलीस ठाणे अभिलेखावरील फरारी असलेल्या आरोपींची विशेष मोहीम राबवून आरोपीचा शोध घेऊन अटक करणे बाबत सूचना केल्या आहेत.
शिरोळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पीएसआय नवनाथ सुळ पो हे कॉ ज्ञानेश्वर सानप  पो हे कॉ हनुमंत माळी पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला गजानन कोष्टी यांना सुचना केली  एका गोपनीय बातमी दरा मार्फत बातमी मिळाली की  संशयित आरोपी हा बीड येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. जयसिंगपूर  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. याकामी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे गडिंग्लज विभागाच्या पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड जयसिंगपूर विभागाचे डी वाय एस पी रामेश्वर वैजने यांचे मार्गदर्शन लाभले अधिक तपास पोहे का ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.

Related Stories

‘त्या ‘ रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल महत्त्वाचे ठरणार

Archana Banage

कोल्हापूर : पुलाची शिरोलीसाठी नगरपरिषद मंजूर व्हावी

Archana Banage

कार्बन न्युट्रल प्रॉडक्ट्सना जागतिक स्तरावर मागणी; उद्योगपती रवी डोली यांचे प्रतिपादन

Abhijeet Khandekar

डंपरच्या धडकेत सांगलीतील तरुणी ठार

Archana Banage

कावळ्याच्या डोळ्याची विहीर…

Archana Banage

कसबा सांगावात खुटवडा वेल खाल्याने आठ शेळ्यांचा मृत्यु

Archana Banage