Tarun Bharat

चौकशीला सामोरे जाणार:हसन मुश्रीफ

ऑनलाईन टीम/कोल्हापूर;

कोल्हापूर- गेल्या सात महिन्यांपासून किरीट सोमय्यांचे माझ्या विरोधात प्रयत्न सुरू आहेत. मात्र जी चौकशी होईल त्याला सामोरे जायला मी तयार आहे. आम्ही योग्य ते सहकार्य करू, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ते कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेतील नेत्यांनी गृह खात्याबद्दल नाराजी दर्शवली आहे. त्यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घटनेबाबत काय ते ठरवतील. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व शंकांचे निरसन केले आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related Stories

कृषीपंप ग्राहकांनी थकबाकीमुक्त व्हावे

Archana Banage

मुख्यमंत्री ठाकरे मंत्रालयातील सर्व सचिवांना संबोधित करणार

Archana Banage

गादीमध्ये लपवून दारुची तस्करी

Archana Banage

क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

Archana Banage

‘या’ चार जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढवणार – राजेश टोपे

Archana Banage

`आधार’च्या खासगी `किट’ला परवानगी

Archana Banage