Tarun Bharat

चौथे रेल्वेगेटच्या दुपदरीकरणाला गती

रेल्वेगेट बंद असल्याने वाहनचालकांचे हाल : नवीन ट्रकचे काम पूर्ण

प्रतिनिधी /बेळगाव

अनगोळ येथील चौथे रेल्वेगेटनजिक शनिवारी रात्रीपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत असल्याने नवीन ट्रक घालणे, जुना टॅक सरकविणे अशी कामे करण्यात येत आहेत. रविवारी उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे वाहनचालकांना मात्र एकतर मजगाव शिवारातून अथवा तिसरे रेल्वेगेटमार्गे शहरात प्रवेश करावा लागला.

मिरज ते लेंढा या दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. टप्प्याटप्याने हे काम पूर्ण केले जात आहे. सध्या बेळगाव ते देसूर या दरम्यानचे काम हाती घेण्यात आले आहे. विकेंडला रस्त्यावर गर्दी कमी असल्याने त्या ठिकाणी रेल्वेगेट बंद ठेवून दुपदरीकरणाचे काम पूर्ण केले जात आहे. शनिवारी रात्रीपासून रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. तेव्हापासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. घालण्यात आलेले कॉंक्रिट फोडून त्याठिकाणी नवीन ट्रक बसविण्यात आला आहे. रविवारी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. 

अनगोळच्या नागरिकांचे हाल

अनगोळ येथील नागरिक चौथे रेल्वेगेटमार्गे शहरात ये-जा करीत असतात. परंतु रेल्वेगेट बंद असल्याने त्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. मजगाव येथील शिवारातील रस्ता अथवा तिसरे रेल्वेगेट मार्गे खानापूर रोड गाठावा लागत होता. रविवारी विकेंड असल्याने कारखान्यांना सुटी होती. त्यामुळे कामगारांची होणारी पायपीट काही प्रमाणात कमी झाली. अन्यथा तिसरे रेल्वेगेट येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असता.

Related Stories

विमानाने 363 किलो व्हॅक्सिन दाखल

Amit Kulkarni

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी 1,11,111 ची देणगी

Amit Kulkarni

फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांचा थाटात शुभारंभ

Amit Kulkarni

श्रीराम सेना हिंदूस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुकास्पद कार्य

Patil_p

महसूल वाढीच्या दृष्टीने कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा

Amit Kulkarni

हिरेबागेवाडीत आणखी नऊ जणांना कोरोना

Patil_p