Tarun Bharat

चौपाटी सुरू पण ग्राहकांचा थंड प्रतिसाद

Advertisements

तब्बल 11 महिन्यानंतर पुन्हा चौपाटी सुरू

प्रतिनिधी/ सातारा

लॉकडाऊनमध्ये बंद असलेली सातारकर खैवय्यांची चौपाटी आळुच्या खड्डयात सूरू झाली. मात्र मोजकेच विक्रेत्यांनी येथे हातगाडे आणून उभे केले आहेत. तब्बल 11 महिन्यानंतर चौपाटी सुरू झाली तरी सातारकर खैवय्यांचा प्रतिसाद मात्र थंडच आहे.

     गेल्या अनेक वर्षापासून गांधी मैदानावर चौपाटी सुरू होती. मात्र मार्च महिन्यात लागू झालेल्या लॉकडाऊननंतर ही चौपाटी बंद होती. ती पुन्हा कधी सूरू होणार यांची प्रतिक्षा विक्रेत्यासह ग्राहक करत होते. मात्र गांधी मैदानावरून ही चौपाटी थेट आळुच्या खड्डयांत सुरू करण्याचा सातारा पालिकेने निर्णय घेतला. या निर्णयाला विक्रेत्यांकडून कडाडून विरोध झाला. तरीही आळुच्या खड्डयात च जागा देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काही विक्रेत्यांनी गेल्या दोन दिवसापासून येथे हातगाडे आणून विक्री सूरू केली आहे. परिसरातील कचरा साफ करण्यात आला आहे. तसेच छोटी झाडेही काढून टाकण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी विक्रेत्यांकडून स्वच्छतेवर भर दिला जात आहे. परंतु ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याने विक्रेते संकटात सापडले आहेत.  

विक्रेत्यांच्यात वादावादी वाढणार

आळुच्या खड्डयात चौपाटी सुरू करण्याच्या निर्णयावर विक्रेत्यांच्यात गटबाजी दिसून आली. तर काही विक्रेत्यांनी आपल्यासह नातेवाईकांच्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे विक्रेते जास्त अन् जागा लहान असे चित्र सद्या तिथे पहायला मिळत आहे. यामुळे स्थानिक विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Stories

राज्य कामगार विमा योजेंतर्गत कर्मचाऱयांना विविध सुविधा

Patil_p

सातारा : कराड येथील निवृत्त शिक्षकाने साकारला पंधरा फुटी आकाशदिव

Abhijeet Shinde

ठोसेघर पठार भागातील बत्ती गुल

Patil_p

सातारा : धामणेर येथे बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्यावर केली कारवाई

Abhijeet Shinde

जिल्हा परिषद राष्ट्रवादीची बटीक म्हणून काम करीत आहे

Patil_p

मिनिटाला एक बाधित; बेडसाठी धावाधाव

Patil_p
error: Content is protected !!