Tarun Bharat

छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्या यांनी केलं ‘हे’ विधान

ऑनलाईन टीम / मुंबई

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आज गुरुवार दिनांक 9 रोजी सुनावणी दरम्यान हा निकाल न्यायालयाने दिला. यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात बरेच दिवस चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अखेर न्यायालयीन लढाई जिंकत आपली निर्दोष मुक्तता करुन घेतली आहे. यावरुन राजकिय आरोप प्रत्यारोपाला सूरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन सध्या चर्चेत असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांवर सातत्याने आरोपांच्या फैरी झडत आहेत. पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेबद्दल विचारले असता. यावेळी त्यांनी अधिक काहीही न बोलता आगे आगे देखो होता है क्या ? एवढंच उत्तर देणं पसंत केलं. यामूळे या प्रकरणावर आता पडदा पडणार कि, पुन्हा यावर राजकिय टोलेबाजी होणार. हे पाहणे उत्सूकतेच ठरणार आहे.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.यावर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

Related Stories

मराठा समाजाला न्याय्यहक्क मिळाला पाहिजे

Archana Banage

सोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा : मुख्यमंत्री

Archana Banage

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला

datta jadhav

सांगली : प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल

Abhijeet Khandekar

पुण्यात सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त; नायजेरियन तरुण अटकेत

datta jadhav

कोल्हापूर महापालिका प्रशासनात `सापशिडी’चा खेळ !

Archana Banage
error: Content is protected !!