Tarun Bharat

छत्तीसगडमध्ये गरोदर महिलांसाठी पहिले विलागिकरण केंद्र सुरू

ऑनलाईन टीम / रायपूर : 


छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात गरोदर महिलांसाठी पहिले विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.

 
जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हे विलगीकरण केंद्र बिलासपूर येथून जवळपास 120 किलो मीटर दूर म्हणजेच केसला गाव येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आले आहे. सध्याच्या स्थितीला या केंद्रात 8 गरोदर महिला असून त्या सर्व प्रवास  कामगार आहेत. ज्या दुसऱ्या राज्यातून येथे आल्या आहेत. 


पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री भूपेश  बघेल यांनी दिलेल्या निर्देशानुसार, या विलगिकरण केंद्रात गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. गर्भवती महिलांसाठी सुरू केलेले हे पहिलेच केंद्र आहे. 


तसेच या केंद्रात पौष्टिक आहार, स्क्रिनिंग सुविधा आणि सुरक्षेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिवसातून तीन वेळा या केंद्राची साफ सफाई केली जाते. त्याच बरोबर 24 तासांसाठी आरोग्य कर्मचारी देखील उपलब्ध असतात, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान, छत्तीसगड मध्ये आता पर्यंत 900 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सध्या 734 रुग्णांवर उपचार सुरू असून 259 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आता पर्यंत चार लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर केली अक्षेपार्ह टीका

Tousif Mujawar

सांगली : आरटीपीसीआर चाचण्या वाढवा-जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar

भारत जपानचा मजबूत सहकारी

Patil_p

जयपूरमध्ये समूह संसर्गाचा धोका

Patil_p

राफेलच्या पहिल्या तुकडीचे फ्रान्समधून उड्डाण

datta jadhav

राज्यात लॉकडाऊन अंशतः शिथिल

Patil_p