Tarun Bharat

छत्तीसगडमध्ये दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीत शिरली कार, ४ जणांचा मृत्यू

Advertisements

छत्तीसगड/प्रतिनिधी

दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या दुर्गामाता विसर्जन मिरवणूक (durga mata visarjan miravnuk) सोहळ्यात सामील झालेल्या तब्बल 20 लोकांना एका कारने चिरडल्याची धक्कादायक घटना (incident) समोर आली आहे. शुक्रवारी छत्तीसगड (chhattisgarh) येथील पत्थळगावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या कारने (CAR) लोकाना चिरडलं आहे त्यामध्ये गांजा भरलेला होता. चिरडलेल्या वीस लोकांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर बकीच्या जखमी लोकांना पत्थळगावातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. बबलू विश्वकर्मा असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातल्या सिंगरौलीचा रहिवासी आहे. तर दुसर्‍या आरोपीचे नाव शिलुपाल साहू असे आहे. पोलिसांनी कार चालकासह दोघांना अटक केलीय.

दरम्यान, विसर्जन मिरवणूक सोहळ्यात गाडी घालणाऱ्या आरोपींपैकी बलू विश्वकर्मा असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे वय २१ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या सिंगरौलीचा रहिवासी आहे. तर दुसर्‍या आरोपीचे नाव शिलुपाल साहू असे आहे. त्याचे वय २६ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या बबरगवा जिल्ह्याचा रहिवासी आहे. दोन्ही आरोपींविरोधात कारवाई करण्यात येत आहे. घटनेमुळे संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Related Stories

निम्म्या कर्नाटकात लॉकडाऊन आणखी शिथिल

Patil_p

महाराष्ट्र : कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 24,581 वर

Rohan_P

समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते बेनी प्रसाद वर्मा यांच्या मुलाचे दिल्लीत निधन

Rohan_P

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला कोरोनाची लागण; केजरीवाल झाले क्वारंटाइन

Rohan_P

मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच महाराष्ट्रात

datta jadhav

योगी आदित्यनाथ यांचा उमेदवारी अर्ज सादर

Patil_p
error: Content is protected !!