Tarun Bharat

छत्तीसगडमध्ये महिलेची 5 मुलींसमवेत आत्महत्या

महासमुंदमध्ये रुळावर आढळले विखुरलेले मृतदेह

महासमुंद : छत्तीसगडच्या महासमुंदमध्ये एका महिलेने स्वतःच्या 5 मुलींसोबत बुधवारी रात्री उशिरा रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. सर्वांचे मृतदेह गुरुवारी सकाळी रेल्वेमार्गावर 50 मीटर अंतरापर्यंत विखुरलेले आढळले आहेत. मृत मुलींचे वय 10 ते 18 वर्षांदरम्यान आहे. मद्यपी पतीशी भांडण झाल्यावर महिलेने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements

इमलीभांठा येथे गुरुवारी रेल्वेमार्गावर मृतदेह दिसून आल्यावर लोकांनी स्थानिक पोलिसांना कळविले होते. रेल्वेलाही याची माहिती देत रेल्वेगाडय़ांची वाहतूक रोखण्यात आली. बेमचा येथील रहिवासी उमा साहू (45 वर्षे) हिचा पती केजरामला दारूचे व्यसन आहे. बुधवारी संध्याकाळी मद्यपान करून पोहोचल्यावर केजराम आणि तिच्या पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. भांडण विकोपास गेल्याने उमा स्वतःच्या पाच मुली अन्नपूर्णा (18 वर्षे), यशोदा (16 वर्षे), भूमिका (14 वर्षे), कुमकुम (12 वर्षे) आणि तुलसी (10 वर्षे) यांना घेऊन घराबाहेर पडल्या. रात्री सुमारे 9-9.30 वाजण्याच्या दरम्यान लिंक एक्स्प्रेससमोर उडी घेत सर्वांनी एकत्रितपणे स्वतःचे जीवन संपविले आहे.

Related Stories

रामनगरी अयोध्येत भाविकांचा महापूर

Patil_p

पंजाबचा सीएम किंवा खलिस्तानचा पीएम

Patil_p

पंजाबमध्ये 140 नवे कोरोनाबाधित

Rohan_P

अमली पदार्थ प्रकरणी अकाली नेत्यावर गुन्हा

Patil_p

ग्राहकांना वारंवार विनंती करीत राहणार

Amit Kulkarni

अतीक अहमदच्या मालमत्ता जप्त करणार ईडी

Patil_p
error: Content is protected !!