Tarun Bharat

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक नक्षलवादी ठार

भुवनेश्वर / ऑनलाईन टीम

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात आज रविवारी दि. 25 जुलै रोजी चकमक उडाली असून यामध्ये एका नक्षलवाद्यांला ठार करण्यात लष्कराला यश आले आहे.

छत्तीसगढ राज्यातील सुकमा जिल्ह्यात ही चकमक उडाली आहे. यामध्ये सुकमा जिल्ह्यातील मिंपा आणि पाडिगुडाच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असल्याचे एसपी सुनील शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

या हल्ल्याच्या एक दिवस आधी,म्हणदे शनिवार दि. 24 जूलै रोजी दंतेवाडा जिल्ह्यात होम रिटर्न या मोहिमेचा भाग म्हणून एसपी अभिषेक पल्लव यांच्यासमोर चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पन केले होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना लसीकरण केले असून नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही प्रयत्न केले जात आहेत.सरकारच्या या पुनर्वसन धोरणांतर्गत सर्व नक्षलवाद्यांना फायदा होईल.

Related Stories

ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

Tousif Mujawar

सगळं विकलं तर सामान्यांना नोकऱ्या कोण देणार?”; भाजप नेत्याचा मोदी सरकारला सवाल

Archana Banage

आरोपींना आठवडय़ाचा कालावधी वापरू द्या

Patil_p

रुपाली ठोंबरेंची बदनामी करणारा ‘मनसे’ चा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

Archana Banage

महाबीजचे सोयाबिन बियाणे उगवलेच नाही

Archana Banage

सार्वजनिक दुर्गापूजा करविणार महिला पुजारी

Patil_p