छत्तीसगडमध्ये पंचायत निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यातील मतदानादरम्यान शुक्रवारी दंतेवाडामध्ये 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात चार महिलांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे आत्मसमर्पणापूर्वी या नक्षलवाद्यांनी सूरनार गावातील मतदान केंद्रावर मतदान केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांवर एक लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.
previous post
next post