Tarun Bharat

छत्तीसगड 9 विकेट्सनी विजयी; गोव्याचा सलग पराभवांचा चौकार

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

कूच बिहार 19 वर्षांखालील चार दिवशीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला आणखी एक दारूण पराभव स्वीकारावा लागला. गोव्याचा हा सलग चौथा पराभव आहे. काल लढतीच्या तिसऱया दिवशी छत्तीसगडने गोव्याला 9 विकेट्सनी पराभूत पेले.

197 धावानी पिछाडीवर राहिल्यानंतर फॉलोऑनने 2 बाद 10 धावावरून खेळण्यास सुरूवात केलेल्या गोव्याचा दुसरा डाव 71.1 षटकात 217 धावात संपला. गोव्यासाठी दुसऱया डावात आयुष वेर्लेकर (नाबाद 89, 172 चेंडू, 9ƒ4, 1ƒ6) आणि उदीत यादव (56 धावा, 77 चेंडू, 6ƒ4, 1ƒ6) यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांनीही सहाव्या विकेटसाठी 120 धावा जोडल्या.

छत्तीसगडसाठी दिपक यादवने 67 धावात 3, मयांक यादव व दीपक सिंगने प्रत्येकी 2 तर देव आदित्य सिगंने एक गडी बाद केला. विजयासाठी आवश्यक 21 धावा छत्तीसगडने विजयासाठी आवशयक 21 धावा एक गडी गमवून काढल्या. गोवयाच्या फरदीन खानने एक विकेट घेतली. गोव्याचा लीगमधील शेवटचा सामना मध्यप्रदेशविरूद्ध 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत होईल.

संक्षिप्त धावफलकः छत्तीसगड, पहिला डाव 369, गोवा, पहिला डाव 172, गोवा दुसरा डाव 2 बाद 10 धावावरून 71.1 षटकात सर्वबाद 217 (इझान शेख 14, जुनैद सय्यद 2, कौशल हट्टंगडी 26, आयुष वेर्लेकर नाबाद 89, उदीत यादव 56, दीप कसवणकर 0, सूजय नाईक 6, श्रेयश उसगावकर 0, फरदीन खान 1 धाव. मयांक यादव 2-16, दिपक सिंग 2-63, देव आदित्य सिंग 1-28, दिपक यादव 3-67). छत्तीसगड, दुसरा डाव, 4.3 षटकात 1 बाद 22 (आशिषकुमार दहारिया नाबाद 21, मयांक यादव 0, मयांक वर्मा नाबाद 1 धाव. फरदीन खान 2.3-0-14-1).

Related Stories

हिंदु जनजागृती समितीतर्फे उपजिल्हाधिकारी, फोंडा पोलीस स्थानकात निवेदन

Amit Kulkarni

डोंगरीचे प्रसिद्ध इंत्रुज मेळ उत्साहात

Amit Kulkarni

‘ओमिक्रॉन’ची सरकारकडून गंभीर दखल

Patil_p

परराज्यांतून येणार सात हजार कामगार

Amit Kulkarni

पर्रा वरद सिद्धिविनायकाचा वर्धापनदिन

Patil_p

वा. सी. बेंद्रे यांच्या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा 6 रोजी

Amit Kulkarni