Tarun Bharat

”छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं”


मुंबई \ ऑनलाईन टीम

यंदाच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन काल, गुरूवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केले होते. आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक नवीन ट्वीट केले आहे. सध्या संभाजीराजे यांचे हे ट्वीट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.त्यामुळे संभाजीराजे यांनी हा इशारा नेमका कुणाला दिला आहे याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर, दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्य सरकारला ६ जूनचा अल्टिमेटम दिलेला आहे. यानंतर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या ट्वीटच्या माध्यमातून नेमका कोणाला इशारा दिला आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related Stories

हार्दिक पटेलचा काँग्रेसला रामराम

datta jadhav

गोवा विधानसभा निवडणूकीची तयारी सर्व मतदारसंघात सुरू

Abhijeet Khandekar

पोलीस अधिकाऱ्याने केले दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर सर

datta jadhav

उद्धव ठाकरेंना धक्का ; माजी आमदार कृष्णा हेगडे शिंदे गटात

Archana Banage

‘रेमडेसिवीर’चे उत्पादन होणार दुप्पट

datta jadhav

आमिर आणि आझादने घेतला आंब्याचा आस्वाद

Archana Banage
error: Content is protected !!