Tarun Bharat

छत्रपती शिवरायांचा पुतळा विटंबना प्रकरणी मनसेकडून निषेध

शाहुवाडी / प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा उपप्रमुख युवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला विटंबना करणाऱ्याच्या पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आलेतर यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते ही उपस्थित होते.

कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटबंना केल्याचे पडसाद जिल्हयात चांगलेच उमटू लागले आहेत  मलकापूर शहरात कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर विठ्ठल मंदिरा शेजारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना जिल्हा उपप्रमुख युवराज काटकर म्हणाले की असे कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन होणे गरजेचे आहे.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी असे कृत्य करणाऱ्यांना  त्यांची जागा दाखवली जाईल. याप्रसंगी तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Stories

मोहडे येथे जनावरांच्या गोठ्याला आग जीवितहानी नाही

Archana Banage

शिरोळ तालुक्यात ८ हजार २२ आपत्तीग्रस्त कुटुंबाचे अनुदान जमा

Archana Banage

सत्याचा सत्याग्रह असून सत्याचा विजय होणार – राजू शेट्टी

Archana Banage

गोकुळ शिरगाव पोलिसांची धडक कारवाई; चोरीच्या चार मोटरसायकली जप्त

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीत खरेदीसाठी मोठी गर्दी

Archana Banage

आता पोलिसांची कानडी परेड; कर्नाटक सरकारचा महत्वाचा निर्णय

Archana Banage