Tarun Bharat

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रायगडावर येणार

ओनलाईन टीम/तरुण भारत

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच रायगडाला भेट देणार आहेत. अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरुन दिली आहे. राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच रायगडाला भेट देणार आहेत. संभाजीराजेंनी यासंदर्भातील गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ट्विटरवरुन एक ट्विट करत राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय.

संभाजीराजेंनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असंही म्हटलंय.

Related Stories

कोल्हापूर एमआयडीसी १६ मे पासून आठ दिवस राहणार बंद

Archana Banage

जागतिक महिला दिनानिमित्त साडे येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन…

Abhijeet Khandekar

राज्यात सोमवारी 14 नवे रुग्ण

Patil_p

मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर दोन नास्तिक भुते- चंद्रकांत पाटील

Archana Banage

देशात मागील 24 तासात 2.76 लाख नवे रुग्ण; मृतांच्या संख्येत किंचित घट

Tousif Mujawar

सांगली : उझबेकिस्थानचा अब्दीमालिक अब्दीसालीमोव्ह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Archana Banage