Tarun Bharat

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी; महादेव जानकरांचे वक्तव्य…

Advertisements

कोल्हापूर / ऑनलाईन टीम;


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता महादेव जानकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात महादेव जानकर ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा, ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केली. इतकंच नाही तर आमदार म्हणून निवडून देण्याचं आवाहन करताना मराठा, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देतो असं आश्वासन दिले आहे.

जानकर पुढे म्हणाले, आमचे ३०-३५ आमदार होऊदेत. १० मिनिटांत ओबीसीची गंमत करतो. मराठा समाजाला पण आरक्षण देतो आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ शकतो. आज मुसलमानावर तर किती अन्याय होत आहे. गॅरेजमध्ये मुसलमान, आंब्याच्या दुकानात बघितलं की मुसलमान, मात्र त्यांच्या कुठं कलेक्टर नाय, काय नाय! सगळी बोंबा बोंब. अन् त्याच मुसलमानाला लोक शिवा देतात. हिंदू बी भिकारी अन् मुसलमान बी भिकारी, अन राज्य चालवणारा तिसराच मालक असतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे,” असं महादेव जानकर यावेळी म्हणाले.

Related Stories

अखेर कोल्हापुरातून टेकऑफ…

Abhijeet Shinde

”सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?”

Abhijeet Shinde

दारु पिवून दंगा करणाऱया गुंडास पोलिसांचा हिसका

Patil_p

फुटबॉल, क्रिकेटच्या सरावाचा बदलतोय ट्रेंड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : लसीसाठी पहाटेपासून रांगेत..तरीही निराशा!

Abhijeet Shinde

केंद्राने गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंधावर आणली शिथिलता

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!