Tarun Bharat

छत्रपती शिवाजी महाराज-भगव्याची विटंबना करणाऱयांवर कारवाई करा

म. ए. युवा समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळुरातील सदाशिवनगर-सांकिकेरे येथील पुतळय़ावर गुरुवार दि. 16 रोजी मध्यरात्री काही समाजकंटकांनी काळा रंग ओतला. चित्रदुर्गमध्येही एका तथाकथित संघटनेच्या म्होरक्मयांनी हिंदू धर्माचे प्रतीक असणारा भगवा ध्वज जाळला. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी उद्यान येथून भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. जवळपास 10 हजाराहून अधिक तरुण, नागरिक आणि हिंदू यामध्ये भाग घेणार होते. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी काही जणांना अटक केली आणि मोर्चा काढण्यास अटकाव केला. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. त्यावेळी पोलिसांनी काही मोजक्मयाच कार्यकर्त्यांना आत जाण्यास मुभा दिली.

छत्रपती शिवाजी महाराज हे एका जाती-धर्माच्या पलीकडचे होते. त्यांनी जाती-धर्म, भाषाभेद कधी केला नाही. त्यांच्यामुळेच आज देशामध्ये हिंदू टिकून आहेत. मात्र, काही दुराभिमानी आणि नेहमीच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱयांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. सरकार आणि पोलिसांच्या सहकार्यातूनच हे सर्व घडले आहे. तेव्हा त्या समाजकंटकांना ताबडतोब अटक करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीकांत कदम, मनोहर हुंदरे, सचिन केळवेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराजांच्या अवमानानंतरफुंकर मारण्याचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्याने धर्मवीर संभाजी चौक येथे म. ए. समिती तसेच विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. तातडीने त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांनाच अटक केली. छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्यानंतर अनगोळमध्ये संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाचा अवमानदेखील झाला. त्यामुळे काही हिंदू संघटनांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

वास्तविक अशा घटना घडू नयेत यासाठी पहिल्यापासूनच सरकारने पाऊल उचलणे गरजेचे होते. यापूर्वीही अनेकवेळा अवमान झाला आहे. त्यावेळी मराठी भाषिकांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता पुन्हा अशाच प्रकारे अवमान झाल्यानंतर केवळ फुंकर मारण्याचा प्रयत्न या संघटनांकडून झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी काही हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱयांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमा घेऊन अवमान करणाऱयांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

यावेळी देखील काही कन्नड माध्यमाच्या पत्रकारांनी म. ए. समितीलाच दोष देण्याचा प्रयत्न केला आहे. जाणूनबुजून हा प्रकार सुरू आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल न विचारता म. ए. समितीवरच रोष धरून ते या संघटनेच्या नेत्यांना आणि स्वामींना प्रश्न करत असल्याचे दिसून येत होते.

यावेळी स्वामी चित्प्रकाशानंद आणि स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य हुक्केरी यांच्यासह राजेंद्र जैन, परमेश्वर हेगडे, वसंत दळवाई, अशोक सदलगी, यल्लाप्पा कुरबर, प्रकाश पुजारी, सिद्धार्थ होसमनी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

बंद पथदिपांबाबत कर्मचाऱयांची उद्धट उत्तरे

Amit Kulkarni

कंग्राळीला केएलई-शाहूनगरमार्गे बसबास चालविण्याचा आदेश

Patil_p

अमित शहा उद्या बेळगावात

Sandeep Gawade

एबी स्पोर्ट्स, टिळकवाडी क्लबची विजयी सलामी

Amit Kulkarni

किणये कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

Amit Kulkarni

ट्रक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

Patil_p