Tarun Bharat

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय सुरु होणार

Advertisements

निवडक विभाग सुरु राहणार : कोरोना नियमावलीचे पालन बंधनकारक

प्रतिनिधी / मुंबई

कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने गेल्या ११ महिन्यांपासून बंद असलेले प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय मंगळवारपासून म्हणजेच १६ फेब्रूवारीपासून पुन्हा सुरु होणार आहे. सदरचे वस्तूसंग्रहालय टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. या संग्रहालयात एकूण १८ प्रदर्शन विभाग असून सुरुवातीला ४ प्रदर्शन विभाग सुरु होणार आहेत. यामध्ये नैसर्गिक इतिहास, भारतीय कलाकुसर, चलन आणि दागिने प्रदर्शन विभाग आणि लहान मुलांचे संग्रहालय सुरु होणार आहे.

नेहरू विज्ञान केंद्र आणि मुंबईतील इतर संग्रहालये टाळेबंदीनंतर पुन्हा सुरु झाली. त्यांच्या आताच्या कार्यपद्धतीचा आम्ही अभ्यास केला. सर्वसामान्य तसेच आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा यालाच आम्ही प्राधान्य देणार आहोत. संग्रहालयांना दरदिवशी १०० ते १५० नागरिक भेट देतात. पण छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय इतर दिवसांमध्ये ५ हजार ते ८ हजार नागरिक भेट द्यायचे. पण कोरोनामुळे नागरिकांच्या भेट संख्येवर मर्यादा राहणार आहेत.

सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत म्हणून खास सोय करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळ प्रत्येकाच्या शरिराचे तापमान, मास्क वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यासोबतच सॅनिटायजरची सोय संग्रहालयात ठिकठिकाणी केली जाणार आहे. सरकार व आंतरराष्ट्रीय संग्रहालय संघटनेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार असल्याचे स्पष्टीकरण संग्रहालयाचे संचालक सब्यासाची मुखर्जी दिले आहे.

तिकिट शुल्कात कपात

संग्रहालयाच्या तिकिट शुल्कातही कपात करण्यात आली आहे. प्रौढांसाठी ५० रुपये तर लहान मुलांसाठी २० रुपये तिकिट शुल्क आकारले जाणार आहे. हेच तिकिट शुल्क प्रौढांसाठी १०० रुपये तर लहान मुलांसाठी ३० रुपये इतके या अगोदर होते. आठवड्यातील सातही दिवस हे संग्रहालय सुरु राहणार आहे. पण सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासासाठी असलेली वेळेची मर्यादा लक्षात घेऊन सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच संग्रहालय सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती संग्रहालयाच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख जोयोती रॉय यांनी सांगितले

Related Stories

शंभर कोटींचा आकडा आला कुठून?

datta jadhav

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

Abhijeet Shinde

काँग्रेस कमिटीच्या इमारतीला 62 वर्षानंतर नवी झळाळी

Patil_p

कणेरी परिसरात सापडले दोन कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात अनलॉकची नियमावली जाहीर; 5 टप्प्यात हटणार निर्बंध

Rohan_P

राज ठाकरेंनी ‘या’ कारणासाठी मानले पीएम मोदींचे आभार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!