Tarun Bharat

छत्रपती संभाजीराजे माझे भाऊच

प्रतिनिधी/ सातारा

मराठा आरक्षण मुद्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे हे दोघे लढत आहेत. त्यांच्या दोघांमध्ये कशी ठिणगी टाकून मराठा समाजाला आरक्षण न मिळेल असा काहीजणांचा कुटील डाव असल्याने काहीही वावडय़ा उठवल्या जात आहेत. दोन्ही राजेंच्यामध्ये वितुष्ट कसे आणता येईल हे पाहिले जात आहे. आज अशाच वावडय़ा उठवणाऱयांना स्पष्ट शब्दात फटकारत खासदार उदयनराजे म्हणाले, छत्रपती संभाजीराजे हे माझे भाऊ आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यात मी सहभागी आहे, असे त्यांनी सांगितले.

  मराठा आरक्षणाचा लढा गेल्या कित्येक वर्षापासून सुरु आहे. हा लढा सुरु असताना काही लोक घुसखोरी करुन लढाईची धार कशी बोथट होईल हे पाहत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा आरक्षणासाठी अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यावेळी आरक्षण दिले. तेही वादात सापडले. सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केल्याने पुन्हा मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र येवू लागल्याचे महाराष्ट्रात चित्र निर्माण होवू लागले. असे असताना राजकीय कंडय़ा सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे हे दोघेही मराठा आरक्षणासाठी वेगवेगळया पद्धतीने आपली मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत. असे असताना दोघेही भाजपाचे खासदार असल्याने त्या दोघांमध्ये कशी भांडणे लावता येतील याचेच सध्या षडयंत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. मराठा नेत्यांच्यामध्ये फुट पाडण्याचा काही मंडळींचा डाव आज प्रत्यक्ष उदयनराजेंनीच हाणून पाडला आहे.

  खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांची भेट होणार होती. ती आज झालेली नाही यावरुन वावडय़ा उठवणाऱयांबाबत खासदार उदयनराजेंना मीडियांनी छेडले असता ते म्हणाले, संभाजीराजेंचे घर आहे. ते कधीही येवू शकतात. पण माझ्या अगोदरचे नियोजित कार्यक्रम असल्याने त्यांच्या स्वीय सहाय्यकांना सांगितले होते. तसे सांगुन सुद्धा का प्रेसला जाहीर केले हे मला माहित नाही. कृपया करुन माझी विनंती आहे चुकीचा अर्थ काढू नये, ते माझे भाऊ आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यात मी त्यांच्याबरोबर आहे. आम्ही भेटणार आहे. फक्त आता माझे दोन-तीन दिवसात अपॉइंटमेट आहेत. त्या झाल्या की भेटणार आहे. त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेवून चर्चा होईल. त्यातून निश्चितच चांगले घडेल असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं खास निमंत्रण

Archana Banage

मतांसाठी आमदारांना ‘टाटा सफारी’ची ऑफर

datta jadhav

फिंगर प्रिंट एक्स्पर्ट परिक्षेत प्रियांका संकपाळ देशात पहिल्या

Archana Banage

“नाजुका” हरपली!..शांताबाई कांबळे यांचे निधन

Abhijeet Khandekar

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचा २६ वर्षांचा प्रवास

Archana Banage

राजधानीसह जिह्यात दिवाळीला उत्साहात झाला प्रारंभ

Patil_p