Tarun Bharat

छोटा राजनची कोरोनावर मात; एम्समधून पुन्हा तिहारमध्ये रवानगी

प्रतिनिधी / सातारा : 

कुप्रसिध्द अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा शुक्रवारी आली होती. छोटा राजन याला कोरोनाची लागण झाल्याने त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. 7 मे रोजी त्याने अखेरचा श्वास घेतल्याची बातमी पसरली होती. मात्र, एम्स रुग्णालयाने ती अफवा असल्याचे सांगितले होते. मंगळवारी छोटा राजन याने कोरोनावर मात केल्याची बातमी समोर आली असून, त्याला कडक बंदोबस्तात पुन्हा तिहार कारागृहात रवाना केले आहे.   

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर हत्या, अपहरण या सारख्या गंभीर गुन्हांशी संबंधित एकूण 70 हून अधिक प्रकरणे नोंद आहेत. तसेच त्याला पत्रकार ज्योती डे यांच्या हत्येप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याने तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हनीफ लकडावाला याच्या हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याच्या हस्तकाला निर्दोष मुक्त केले. छोटा राजन 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. 2015 ला त्याला विदेशातून गुन्हेगार हस्तांतरणाच्या मार्फत त्याला भारतात आणण्यात आले आणि तेव्हापासून तो तिहार जेलमध्येच आहे. आता कोरोनावर मात केल्याने त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली आहे.  

मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये अनेक घडामोडीनंतर तो फरारी झाला होता. त्याला तीन भाऊ असून त्यापैकी दीपकभाऊ निकाळजे व आकाश निकाळजे हे रिपाइंच्या माध्यमातून काम करत आहे तर प्रकाश निकाळजे यांचे निधन झालेले आहे. त्याला दोन बहिणीही असून त्या त्यांच्या सासरी असतात. 1985 च्या अगोदर छोटा राजन गिरवीत, फलटण तालुक्यात येत असायचा. मात्र, त्यानंतर त्याचे विश्वच बदलून गेल्याने तो गिरवीला कधी आलेला नाही. त्याची भावभावकी गिरवीत असून, दीपकभाऊ निकाळजे यांचे गिरवीला येणे-जाणे असते.

Related Stories

Pegasus Spyware : फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्या काळात झाले ; फडणवीसांचा दावा

Archana Banage

शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाज राहणार बंद

datta jadhav

”प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी कारण…”

Archana Banage

शरद पवारांचा दौरा तुर्तास रद्द

Patil_p

मिरज पूर्वच्या वंचित भागाला मिळणार म्हैसाळचे पाणी

Abhijeet Khandekar