Tarun Bharat

छ. राजाराम सहकारी साखर कारखाना एकरकमी एफ.आर.पी. देणार !

Advertisements

प्रतिनिधी / कसबा बावडा

छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ लवकरच सुरू होणार असून या वर्षाची पूरस्थिती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा साकल्याने विचार करून या हंगामात गळीतासाठी येणाऱ्या ऊसास एकरक्कमी एफआरपी आदा करणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली.

कारखान्याची या हंगामाची एकूण एफ.आर.पी. रू.३४५३.९० प्रति मे. टन इतकी होत असून त्यामधून २०२०-२१ गाळप हंगामाचा सरासरी ऊस तोडणी वाहतुक खर्च रु.६१३.९० प्रति मे.टन वजा जाता निव्वळ देय एफ.आर.पी. रू.२८४०/- प्रति मे. टन इतकी येत आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हा. चेअरमन वसंत बा. बेनाडे, सर्व संचालक मंडळ सदस्य, प्रकाश चिटणीस-कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

मनोहर भोसलेसह अन्य भोंदू बाबांच्या विरोधात भाविक एकवटले

Abhijeet Shinde

Satara; अमोल यादव यांची युरोप येथे ऑलम्पिक दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी निवड

Abhijeet Khandekar

श्री.तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध : आठ नव्या चेहऱ्यांना संधी

Sumit Tambekar

आरक्षणाचे `’स्ट्रक्चर’च बदलणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कबनूर गावचा पाणीपुरवठा बंद

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अरुण नरके यांची गोकुळच्या मैदानातून माघार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!