Tarun Bharat

जंगली मांजरीच्या नखांची तस्करी करणाऱया दोघांना अटक

प्रतिनिधी/ सातारा

जंगली मांजरीच्या नख्यांची तस्करी करणाऱया दोघांना सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने ठोसेघर (ता. जि. सातारा) येथील बस थांब्यावर अटक केली. संदिप लक्ष्मण सप्रे (मु. जांबे, ता. जि. सातारा व राजेंद्र गोकुळदास कदम (रा. महादरे ता. जि. सातारा) अशी दोघांची नावे असून त्यांच्याकडून जंगली मांजरीची 14 नखे, मोटरसायकल व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत वनविभागाने दिलेली माहीती अशी, सातारा वनविभागाचे भरारी पथकाला मौजे ठोसेघर (ता. जि. सातारा) येथील बस थांब्यावर दोन इसम वन्यप्राण्यांच्या नख्या घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार सातारा-ठोसेघर रोडलगत असणाऱया मौजे ठोसेघर येथील बस थांब्यावर वनविभागाच्या भरारी पथकाने सापळा लावला. त्यावेळी बस थांब्याजवळ असणाऱया दोन इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती तपासणी घेतली असता, दोन्ही इसमांकडे मिळून जंगली मांजर या वन्यप्राण्यांच्या एकुण 14 नख्या मिळून आल्या. याप्रकरणी संदिप लक्ष्मण सप्रे (मु. जांबे, ता. जि. सातारा) व राजेंद्र गोकुळदास कदम (रा. महादरे, ता. जि. सातारा) यांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याकडील 14 नख्या व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल (एम एच 11 सी एस 4327) तसेच दोन्ही इसमांकडील 3 मोबाईल असा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार वनगुन्हा नोंद करण्यात आली आहे. 

जंगली मांजर (शास्त्राrय नाव- इात्ग्s म्प्aल्s) हा वन्यप्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा वन्यप्राणी आहे. या प्राण्याला वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे  अनुसुची घ्घ् भाग – घ्घ्  मध्ये स्थान देऊन शासनाने प्राण्याला व्यापक संरक्षण दिले आहे परंतु अशा मौल्यवान प्राण्याची त्याच्या नख्याकरीता शिकार करण्याची अपप्रवृत्ती समाजामध्ये आहे. वन्यप्राणी शिकारीबाबत अथवा तस्करीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्याबाबत 1926 या टोल फ्री क्रमांकावर कळविणेचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात येत आहे.

या कारवाईत वनपरीक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन) सातारा सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दिपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस हवालदार सुहास पवार, राजेश विरकर व वाहन चालक दिनेश नेहरकर यांनी सहभाग घेतला.

Related Stories

वारंवार तक्रारी नंतर वाहतूक शाखेची कारवाई

Patil_p

बिबटय़ाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

Patil_p

सातारा जिल्ह्यात आज २७ जणांना डिस्चार्ज तर ७ जण पॉझिटिव्ह

Archana Banage

आमदार शिवेंद्रराजेंकडून लुंगीवरुन समाचार

Patil_p

सातारा पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन

Archana Banage

नगरपालिकांमधून दिव्यांगांना मिळणार दुकानगाळे

Patil_p