Tarun Bharat

जखमी घोडय़ाची गो-शाळेत रवानगी

प्रतिनिधी / बेळगाव

शहर आणि उपनगरामध्ये मोकाट फिरणाऱया भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे श्रीनगर परिसरात जखमी अवस्थेत असलेल्या घोडय़ाला पकडून त्याची रवानगी गो-शाळेत करण्यात आली. तसेच उपचार करण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकाऱयांना सूचना करण्यात आली आहे.

मोकाट फिरणाऱया जनावरांचा बंदोबस्त करून त्यांची रवानगी गो-शाळेत केली जाते. तसेच काहीवेळा जखमी अवस्थेत असलेल्या जनावरांबाबतही महापालिकेकडे तक्रारी करण्यात येतात. श्रीनगर परिसरात जखमी अवस्थेत घोडा असल्याची माहिती पशु दया संघटनेने महापालिकेच्या अधिकाऱयांना दिली. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱयांनी बुधवारी सकाळी श्रीनगर परिसरात  पाहणी केली असता, घोडा जखमी अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. घोडय़ाच्या पायास जखम झाल्याचे आढळून आले. त्यामुळे घोडय़ाच्या मालकांबाबत आजूबाजूला चौकशी केली असता, घोडय़ासोबत काही मुले खेळत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. पण मालकांबाबत माहिती मिळाली नाही. त्यामुळे सदर घोडय़ाला व्यवस्थित हाताळून दोरी बांधण्यात आली. त्यानंतर मनपाच्या वाहनामधून गो-शाळेत दाखल करण्यात आले आहे.

तसेच घोडय़ावर औषधोपचार करण्यासाठी पशु वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिकाऱयांना संपर्क साधण्यात आला. कोरोनामुळे काही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आल्यानंतर पाठविण्यात येईल असे सांगण्यात आल्याची माहिती महापालिकेचे पशु संगोपन विभागाचे निरीक्षक राजू संकण्णावर यांनी दिली.

Related Stories

चेन स्नॅचिंग प्रकरणी दोघा जणांना अटक

Patil_p

चंदगड, आजरा, कोवाड भागात बससेवा सुरू करा

Amit Kulkarni

घरांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण

Amit Kulkarni

हेमंत निंबाळकर यांचा कोरोना जागृतीचा व्हिडीओ व्हायरल

Patil_p

कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर लोकसभेत सुप्रिया सुळे आणि विनायक राऊतांचा हल्लाबोल

Archana Banage

पोटनिवडणुकीच्या निकालाचा २०२३ निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही: येडियुरप्पा

Archana Banage