Tarun Bharat

जगदीश शेट्टर यांनी घेतला कोरोनाबाबतचा आढावा

Advertisements

माणुसकीच्या दृष्टिकोनातून रुग्णांवर करा उपचार : शहरातील खासगी हॉस्पिटल्सकडूनही सहकार्याची अपेक्षा

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हा हा सीमाभागामध्ये वसलेला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण ताकदीनिशी काम करत आहे. असे असले तरी खासगी हॉस्पिटलनीही सहकार्य करणे काळाची गरज आहे. सध्याची परिस्थिती आणीबाणीची आहे. सरकारी अथवा खासगी हॉस्पिटल असो रुग्णांवर माणुकीच्या दृष्टिकोनातून उपचार करा आणि कोरोनावर नियंत्रण मिळवा, असे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱयांना सांगितले.

रविवारी सरकारी विश्रामगृह येथे अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱयांना विशेष सूचना केल्या. जिल्हय़ातील कोरोनाबाबतचा आढावा घेऊन त्यांनी कोरोना रुग्णांवर सर्वतोपरी उपचार करण्याची सक्त ताकीद दिली आहे. ऑक्सिजन पुरवठय़ाबाबत सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजनविना एकाही रुग्णाचा मृत्यू होता कामा नये, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेणे महत्त्वाचे आहे.

खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात रक्कम आकारली जात आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, थोडीशी माणुसकी असेल तर योग्य दरात कोरोना रुग्णांवर उपचार करावेत, असे त्यांनी सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठय़ाबाबत प्रत्येक जिल्हय़ातील जिल्हाधिकाऱयांना अधिकार दिले आहेत. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱयांकडे जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी ज्या रुग्णाला त्या इंजेक्शनची गरज आहे त्या रुग्णावर वापर करण्यास प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आतापर्यंत अधिकाऱयांनी जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा इतर प्राथमिक आरोग्य केंद्रे असोत त्या ठिकाणी अधिक उपचार होणे महत्त्वाचे आहे. कारण रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. त्यादृष्टीने प्रत्येकानेच काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

गरजू रुग्णांनाच ऑक्सिजन द्या

ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडची सोय करण्यासाठी प्राधान्य द्यावे. ज्या रुग्णाचे ऑक्सिजन लेव्हल कमी झाले आहे त्याला तातडीने ऑक्सिजन दिले पाहिजे. तेव्हा प्रथम ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांनाच ऑक्सिजन द्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी जिल्हय़ातील कोरोनाबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर निर्माण होणाऱया समस्यादेखील त्यांनी सांगितल्या.

या बैठकीला खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी शशिकांत मुन्याळ, बिम्सचे कार्यकारी संचालक विनय दास्तीकोप, अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

महाराष्ट्र पासिंग वाहनांना केले लक्ष्य

Amit Kulkarni

लसीबाबत साशंकता नको

Amit Kulkarni

बसुर्ते नवग्रह ब्रह्मलिंग मंदिर उद्घाटन समारंभाला प्रारंभ

Patil_p

वसती योजनांची कामे तातडीने पूर्ण करा

Amit Kulkarni

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान

Amit Kulkarni

सेंट ऍन्थोनी फेस्टनिमित्त मिरवणूक

Amit Kulkarni
error: Content is protected !!