सीबीआयच्या विशेष न्यायालयाने उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना 10 जानेवारी रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. जगनमोहन यांनी मुख्यमंत्रिपदामुळे व्यस्त राहत असल्याचे सांगत सुनावणीस गैरहजर राहण्याची अनुमती देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मुख्यमंत्री झाल्यापासून रेड्डी सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत. विशेष न्यायालय प्रत्येक शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी करत आहे.


previous post
next post