Tarun Bharat

जगन्नाथ रथयात्रेला परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


सुप्रीम कोर्टाने 23 जूनला ओडिशामध्ये होऊ घातलेल्या जगन्नाथ रथयात्रेला परवानगी देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा स्थगित करण्यात येत आहे. 


याबाबत सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या खटल्याची सुनावणी करताना सांगितले की, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन, या रथ यात्रेला परवानगी दिली जाऊ शकत नाही. 


पुढे ते म्हणाले, जर आम्ही यावर्षी रथयात्रेला परवानगी दिली, तर भगवान जगन्नाथ देखील आम्हाला माफ करणार नाही. कारण या कोरोना संकटात अशा धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. 


तसेच स्वयंसेवी संस्थ्या ओडिशा विकास परिषदेकडून एक याचिका करण्यात आली होती. या याचिकेत म्हटलं आहे की, 10 ते 12 दिवस चालणाऱ्या या रथयात्रेसाठी जवळपास 10 लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जर ही रथयात्रा पार पडली तर लाखो लोकांना संसर्ग होण्याची भीती आहे. तसेच याचिकेत ओडिशा सरकारनेही राज्यात 30 जूनपर्यंत धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

अमीषा पटेलला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Patil_p

चेन्नईत भाजपने उघडले खाते

Patil_p

केंद्र सरकारकडे 20 हजार कोटीची मागणी

Patil_p

योगी आदित्यनाथ सरकारमुळे उत्तरप्रदेश माफियांपासून मुक्त

Amit Kulkarni

चीनशी तणाव, भारत-जपानचा युद्धाभ्यास

Patil_p

संभाजीराजेंची ठरवून कोंडी; फडणवीस यांचा शिवसेना, राष्ट्रवादीवर हल्लाबोल

Archana Banage
error: Content is protected !!