ऑनलाईन टीम / क्वीटो :
इक्वाडोरच्या गॅलापागोस बेटावरील जगप्रसिद्ध ‘डार्विन्स आर्च’ या दगडी कमानीचा वरचा भाग नैसर्गिक झीज झाल्यामुळे समुद्रात कोसळला. इक्वाडोरच्या पर्यावरण मंत्रालयाने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती देत एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये कमानीचा वरचा भाग कोसळल्याचे दिसत असून, दोन खांब उभे असल्याचे दिसत आहेत.
प्रशांत महासागरात डार्विन बेटापासून 1 किलोमीटर अंतरावर ‘डार्विन्स आर्च’ नावाची एक जगप्रसिद्ध दगडी कमान होती. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या दगडी कमानीला प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या नावावरून ‘डार्विन्स आर्च’ असे नाव देण्यात आले होते.