Tarun Bharat

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 2 लाखांपार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

  जगभरात आतापर्यंत 29 लाख 21 हजार 439 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तर 2 लाख 3 हजार 289 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 8 लाख 36 हजार 679 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.  अजूनही 18 लाख 80 हजार 804 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 58 हजार 202 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डओमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 9 लाख 60 हजार 651 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 54 हजार 256 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्ये 2 लाख 23 हजार 759 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 22 हजार 907 जणांचा मृत्यू झाला आहे. 

इटलीत आतापर्यंत 1 लाख 95 हजार 331 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 26 हजार 384 जण दगावले आहेत. अमेरिकेनंतर इटलीतील मृतांची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतातही 26 हजार 283 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 825 जण दगावले आहेत. तर 5939 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 19 हजार 519 ॲक्टिव्ह केसेस आहेत.

Related Stories

चिलीमध्ये कपडय़ांचा डोंगर

Patil_p

माधुरी दीक्षित कडून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यक निधीत मदत

prashant_c

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

स्कॉट एटलस यांचा राजीनामा

Omkar B

नारायण राणेंच्या बंगल्यात महापालिका पथक दाखल

Archana Banage

लमान बंजारा मेळाव्यात विविध मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर

Abhijeet Khandekar