Tarun Bharat

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 3 लाखांपार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

जगभरात आतापर्यंत 45 लाख 25 हजार 411 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 3 लाख 03 हजार 372 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 17 लाख 03 हजार 808 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 18 हजार 231 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 45 हजार 560 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 14 लाख 57 हजार 593 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 86 हजार 912 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्ये 2 लाख 72 हजार 646 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 27 हजार 321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

इटलीत आतापर्यंत 2 लाख 23 हजार 096 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 31 हजार 368 जण दगावले आहेत. भारतातही 81 हजार 997 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 2649 रुग्ण दगावले आहेत. 27 हजार 969 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 51 हजार 379 ॲक्टिव्ह केसेस आहेत.

Related Stories

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना मातृशोक

datta jadhav

स्पेनमध्ये 4 सिंह कोरोनाने आजारी

Omkar B

कामावर नव्हता तरीही 15 वर्षांपासून वेतन

Patil_p

15 वर्षांत वाढली एव्हरेस्टची उंची

Patil_p

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही शिंदे-फडणवीस गप्प का?

Archana Banage

सीमारेषेवरून 250-300 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत

datta jadhav