Tarun Bharat

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 8.5 लाखांवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

जगभरात कोरोनाने आतापर्यंत साडेआठ लाखांहून अधिक बळी घेतले आहेत. जगात 2 कोटी 56 लाख 38 हजार 230 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामधील 8 लाख 54 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 कोटी 79 लाख 42 हजार 911 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 68 लाख 40 हजार 544 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 61 हजार 158 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 62 लाख 11 हजार 798 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 87 हजार 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृतांची संख्या आहे. ब्राझीलमध्ये 39 लाख 10 हजार 910 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 21 हजार 515 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ब्राझीलनंतर भारतात कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. भारतात 36 लाख 91 हजार 166 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 65 हजार 435 जण दगावले आहेत. 

Related Stories

ऑस्ट्रेलिया : 6 लाख

Patil_p

पाकिस्तानात बसमध्ये स्फोट; चिनी अभियंत्यांसह 8 ठार

datta jadhav

पॅलेस्टाईनमध्ये भारतीय राजदुताचा संशयास्पद मृत्यू

Patil_p

दिल्लीत आज दिवसभरात 1035 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

इमॅन्युएल मॅक्रॉन पुन्हा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी

Patil_p

आयर्लंडचे पंतप्रधान रुग्ण सेवेसाठी पुन्हा एकदा डॉक्टरी पेशात

prashant_c
error: Content is protected !!