Tarun Bharat

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेदोन कोटींवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेदोन कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 1 कोटी 75 लाख 05 हजार 005 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 6 लाख 77 हजार 454 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

गुरुवारी जगभरात 2 लाख 87 हजार 063 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 6426 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1.75 लाख बाधितांपैकी 1 कोटी 09 लाख 60 हजार 318 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 58 लाख 67 हजार 233 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 66 हजार 327 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 46 लाख 35 हजार 226 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 22 लाख 85 हजार 613 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 55 हजार 306  जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 26 लाख 13 हजार 789 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 18 लाख 24 हजार 095 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 91 हजार 377 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

चांगली झोप लागली, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे जाहीर करा; धनंजय महाडिक

Abhijeet Khandekar

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी पेटवली ट्रेन; एका युट्युबरसह ४०० जणांविरोधात FIR दाखल

Archana Banage

सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा

Archana Banage

तालिबानकडून सरकार स्थापनेसाठी पाक, चीनसह 6 देशांना निमंत्रण

datta jadhav

लसीकरण आता 24 तास

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर रैना म्हणाला…

prashant_c