Tarun Bharat

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटींवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 2 कोटी 25 हजार 784 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 7 लाख 34 हजार 012 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

रविवारी जगभरात 2 लाख 19 हजार 598 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 4798 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2 कोटी बाधितांपैकी 1 कोटी 29 लाख 317 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 63 लाख 91 हजार 455 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 64 हजार 661 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 51 लाख 99 हजार 444 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 26 लाख 64 हजार 701 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 65 हजार 617 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 30 लाख 35 हजार 582 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 21 लाख 18 हजार 460 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 1 हजार 136 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 3 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण

Archana Banage

… तर 2 एप्रिलला लॉकडाऊन लावावा लागेल : अजित पवार

Tousif Mujawar

”लस घेतलेल्यांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची परवानगी द्या”

Archana Banage

सौदी अरेबिया : आंतरराष्ट्रीय विमानसेवा एक आठवड्यासाठी बंद

datta jadhav

कर्नालमधील शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात

Patil_p

केरळ : आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू

Archana Banage