Tarun Bharat

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.40 कोटींवर

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.40 कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 2 कोटी 40 लाख 61 हजार 215 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8 लाख 23 हजार 513 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

मंगळवारी जगभरात 2 लाख 48 हजार 166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 6056 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2.40 लाख बाधितांपैकी 1 कोटी 66 लाख 08 हजार 597 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 66 लाख 29 हजार 105 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 61 हजार 792 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 59 लाख 55 हजार 728 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 32 लाख 54 हजार 282 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 82 हजार 404 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 36 लाख 74 हजार 176 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 28 लाख 48 हजार 395 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 16 हजार 666 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

कर्नाटकच्या नव्या नियमामुळे पुणे-बेंगळूर हायवेवर वाहतूक कोंडी

Abhijeet Shinde

विद्युत मोटार चोरी प्रकरणी तीन मोटारी व साहित्यासह तिघे जेरबंद

Sumit Tambekar

न्यूझीलंड : ‘स्टफ’ मीडिया कंपनीची कवडीमोलाने विक्री

datta jadhav

रशियाची धमकी, अमेरिकेचे प्रत्युत्तर

Patil_p

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील यांचे निधन

Abhijeet Shinde

दोन तुकडय़ांमध्ये मिळाला अभिनेत्रीचा मृतदेह

Patil_p
error: Content is protected !!