Tarun Bharat

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींच्या उंबरठ्यावर

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जगात आतापर्यंत 2 कोटी 49 लाख 08 हजार 975 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8 लाख 41 हजार 331 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

शुक्रवारी जगभरात 2 लाख 84 हजार 967 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2.49 लाख बाधितांपैकी 1 कोटी 72 लाख 98 हजार 404 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 67 लाख 69 हजार 240 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 61 हजार 194 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 60 लाख 96 हजार 235 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 33 लाख 75 हजार 838 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 85 हजार 901 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 38 लाख 12 हजार 605 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 29 लाख 76 हजार 796 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 19 हजार 594 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

कोरोना फैलाव : WHO चा भारताला गंभीर इशारा

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात मागील 24 तासात 8,470 नवे कोविड रुग्ण; 188 मृत्यू

Tousif Mujawar

बंडातात्या कराडकर यांचा निषेध;काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन

Abhijeet Khandekar

लसीने नाही थांबणार कोरोना विषाणू

Patil_p

50 टक्के सौंदर्यप्रसाधने धोक्याची, घातक रसायनांचा वापर

Patil_p

भाजपसोबत युती करा, तरच बंड मागे? शिवसेनेतील फुटीरवाद्यांची मागणी

Archana Banage
error: Content is protected !!