Tarun Bharat

जगभरातील दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक

Advertisements

ऑनलाइन टीम / अमेरिका : 


अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन, टेल्साचे सीईओ एलन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि आयफोन निर्मित ॲप्पल सह जगातील बड्या कंपन्या आणि नेत्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या कालावधीत हॅकर्सनी एक लाखाहून अधिक डॉलर्स कमावले आहेत. बिटकॉईन दुप्पट करून देण्याचे आमिष या ट्विटद्वारे दाखवण्यात आले. या आमिषाला भुलून या खात्यांच्या शेकडो अनुयायांनी जवळपास दहा लाख डॉलर्स या हॅकर्सच्या अकाउंटला पाठवले.

 
या संदर्भात बोलताना ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष जॅक डॉर्सी यांनी ट्विटरवर झालेल्या सायबर हल्ल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. डॉर्सी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुनच यासंदर्भात भाष्य करताना आम्ही या समस्येवर काम करत आहोत असं म्हटलं आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री एकच्या सुमारास ट्विटवरील काही दिग्गज मंडळीची अकाउंट हॅक करुन त्यावरुन विचित्र ट्विट करण्यात आले.

अकाउंट हॅक झालेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, अमेरिकन नेते जो बिडेने, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांच्याबरोबरच अ‍ॅपलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीच्या मालकीच्या काही खात्यांचा समावेश होता. याचसंदर्भात आता डॉर्सी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

पुढे ते म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी खूप कठीण दिवस आहे. जे काही घडले ते खरोखरच भयानक आहे. याचे समाधान आम्ही शोधणार असून त्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार आहोत. नेमके हे कसे झाले हे कळेल, तेव्हा नक्कीच तुम्हाला याबाबत कळवण्यात येईल, असेही डॉर्सी यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

१५ वर्षापेक्षा जुनी असलेली वाहने आता भंगारात निघणार; मंत्री गडकरींची घोषणा

Archana Banage

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्विकारला आपला पदभार

Abhijeet Khandekar

रशियामध्ये आवश्यक औषधांची टंचाई

Patil_p

सरकार कडून ‘आरोग्य सेतू’ ॲप लॉन्च

prashant_c

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांनी केली खास पोस्ट, म्हणाले…

Archana Banage

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!