Tarun Bharat

जगभरातील 74 हजार कोरोना संक्रमित झाले ठणठणीत बरे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना विषाणूचा फैलाव जगभरातील 100 हून अधिक देशात झाला आहे. या रोगावर अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याने त्याला सपोर्टीव्ह औषधे देण्यात येतात. तरी देखील जगभरातील 73,968 कोरोना संक्रमित रुग्ण या रोगातून सुखरूप बरे झाले आहेत.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरात 1 लाख 56 हजारहून अधिक जणांना याची लागण झाली आहे. तर 5833 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या वृहान प्रांतातून पसरत असलेल्या विषाणूने चीनमध्येच 3085 जणांचा बळी घेतला आहे. तर 81 हजार जणांना याची लागण झाली आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे जगभरातील अनेक शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाटय़गृह बंद ठेवण्यात आली आहेत. चीनमधून लागण झालेल्या 81 हजार कोरोना रुग्णांपैकी 54 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर चीनपाठोपाठ इटलीमधील 1966 रुग्ण, इराणमधील 2959 तर स्पेनमधील 517 जण यातून बरे झाले आहेत.

Related Stories

काश्मीरमधील उरी येथे 25 कोटींचे हेरॉईन जप्त

Patil_p

पश्चिम बंगाल निकालाचा अन्वयार्थ…

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाकडून जलद सुनावणीची योजना

Patil_p

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा

Patil_p

सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर ‘या’ कारणामुळे कोसळले

Abhijeet Khandekar

‘या’ राज्यांमध्ये जानेवारीपासून सुरू होणार शाळा

Tousif Mujawar