Tarun Bharat

जगभरात कोरोनाने घेतले 27 लाख बळी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

जगभरात आतापर्यंत 12 कोटी 24 लाख 66 हजार 438 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 27 लाख 04 हजार 903 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 9 कोटी 87 लाख 25 हजार 789 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 2 कोटी 10 लाख 35 हजार 746 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 89 हजार 262 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 03 लाख 58 हजार 880 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामधील 5 लाख 52 हजार 470 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलचा या आकडेवारीत दुसरा क्रमांक लागतो. तेथे 1 कोटी 17 लाख 87 हजार 600 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 2 लाख 87 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

प्रियांका राधाकृष्णन ठरल्या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री

datta jadhav

तैवानमध्ये आगीत 46 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

नेपाळमध्ये ‘कोविशिल्ड’ला मंजुरी

datta jadhav

चीन संरक्षण बजेटमध्ये करणार 7.1 टक्क्यांची वाढ

datta jadhav

युक्रेनच्या 30 सैनिकांकडून रशियाचा ताफा उद्ध्वस्त

Patil_p

भारताला आणखी एक सुवर्णपदक

datta jadhav