Tarun Bharat

जगभरात मागील 24 तासात 2.60 लाख नवे कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात मागील 24 तासात 2 लाख 60 हजार 04 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 5899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 कोटी 59 लाख 699 वर पोहचली आहे. मृतांचा एकूण आकडा 8 लाख 61 हजार 249 एवढा आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

2.59 कोटी बाधितांपैकी 1 कोटी 81 लाख 93 हजार 571 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 68 लाख 45 हजार 879 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 60 हजार 546 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 62 लाख 51 हजार 571 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 34 लाख 96 हजार 913 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 88 हजार 900 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 39 लाख 52 हजार 790 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 31 लाख 59 हजार 096 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 22 हजार 681 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

गुगलचे खास डूडल : डॉक्टर्स, नर्सच्या कामाला सलाम!

prashant_c

मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावरून दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला

Abhijeet Shinde

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ जवळील टोल नाका रद्द करा; राष्ट्रवादीची मागणी

Abhijeet Shinde

फ्रान्सच्या पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्‍स

datta jadhav

महाराष्ट्र : बुधवारी 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P

लॉयड ऑस्टिन अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री होणार

Patil_p
error: Content is protected !!