Tarun Bharat

जगभरात 1.41 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात आतापर्यंत 2 कोटी 13 लाख 79 हजार 551 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 41 लाख 64 हजार 254 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

शुक्रवारी जगभरात 2 लाख 85 हजार 901 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5945 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 7 लाख 63 हजार 836 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 64 लाख 51 हजार 461 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 64 हजार 565 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 54 लाख 76 हजार 266 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 28 लाख 75  हजार 147 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 71 हजार 535 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 32 लाख 78 हजार 895 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 23 लाख 84 हजार 302 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 06 हजार 571 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

अब्जाधीशांचा ‘समर कँप’ सुरू

Patil_p

धार्मिक, राजकीय आयोजनांमुळे कोरोना संक्रमणाचा फैलाव

Amit Kulkarni

स्पुतनिक-5 अन् कोविशिल्डचे संयुक्त परीक्षण

Patil_p

…तर प्रसारमाध्यमांवर गुन्हे दाखल करू – नारायण राणे

Archana Banage

रेल्वे सेवाही 3 मे पर्यंत बंद राहणार

prashant_c

मलिक आणि देशमुखांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव

Archana Banage
error: Content is protected !!