Tarun Bharat

जगभरात 2 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात आतापर्यंत 2 कोटी 83 लाख 24 हजार 870 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 03 लाख 39 हजार 603 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

गुरुवारी जगभरात 3 लाख 02 हजार 593 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5992 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 9 लाख 13 हजार 913 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 70 लाख 71 हजार 354 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 60 हजार 753 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 65 लाख 88 हजार 163 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 38 लाख 79 हजार 960 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 96 हजार 328 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 45 लाख 59 हजार 725 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 35 लाख 39 हजार 983 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 76 हजार 304 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

मुंबई महापालिकेची नवीन नियमावली जारी; लक्ष्मीपूजन वगळता मुंबईत फटाक्यांना बंदी

Tousif Mujawar

अफगाणिस्तानच्या बंडखोर बीबी आयशा यांची शरणागती

Patil_p

जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश

datta jadhav

न्यूझीलंडमध्ये पुन्हा निर्बंध

datta jadhav

अमेरिकेतील मॉलमध्ये गोळीबार, 3 जणांचा मृत्यू

Patil_p

झारखंडमध्ये प्रसूतीपूर्वी होणार 50 हजार गर्भवती महिलांची कोरोना टेस्ट

Tousif Mujawar
error: Content is protected !!