Tarun Bharat

जगभरात 87.52 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात आतापर्यंत 1 कोटी 46 लाख 70 हजार 609 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 87 लाख 52 हजार 542 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

रविवारी जगभरात 2 लाख 20 हजार 162 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 4316 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 6 लाख 09 हजार 559 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 53 लाख 08 हजार 508 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 59 हजार 645 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 38 लाख 99 हजार 358 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 18 लाख 02 हजार 539 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 43 हजार 310 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 20 लाख 99 हजार 896 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 13 लाख 71 हजार 229 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 79 हजार 533 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

Abhijeet Khandekar

डेंग्यू नियंत्रणासाठी केंद्राची पथके रवाना

datta jadhav

दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार ;सदा सरवणकरांची माहिती

Abhijeet Khandekar

महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Archana Banage

गॅस सिलिंडर महागला

datta jadhav

कर्नाटक: शिवकुमार यांनी सरकारला ३ महिन्यांत ८० टक्के प्रौढ लोकांचे लसीकरण करण्याचे दिले आव्हान

Archana Banage