Tarun Bharat

जगलबेट ग्रामस्थांनी बस रोखल्या; वाहतुकीची कोंडी

Advertisements

वार्ताहर / रामनगर

दांडेली बस डेपोच्या अधिकाऱयांनी आश्वासनांची पूर्तता न केल्याने मंगळवारी जगलबेट ग्रामस्थांनी दांडेली विभागाच्या बस रोखून धरल्या होत्या. त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

  रामनगर-जगलबेट भागातून गणेशगुडी व दांडेली येथे 100 हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. या भागातील विद्यार्थ्यांसाठी एकच बस असून त्यांना शालेय शिक्षणासाठी जाताना बस नसल्यामुळे अनेकदा घरातच बसावे लागते तर काहीवेळा गर्दी पाहून बस थांबवत नाहीत तसेच अनेकदा बसमधील चेंगराचेंगरीत विद्यार्थी जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या मार्गावर आणखीन एक बस सुरू करण्याची मागणी गावकऱयांनी दांडेली बस विभागाकडे केली होती. तसेच तातडीने बस न पाठविल्यास दांडेली विभागाच्या सर्व बसेस रोखण्यात येतील, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी दांडेली विभागाच्या पाच बसेस गावकऱयांनी रोखून धरल्या. त्यामुळे अखेर रामनगर उपनिरीक्षिका मंजुळा रावजी यांनी मध्यस्थी करून बुधवारपासून ज्यादा बस सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी अडविलेल्या 5 बसेस सोडण्यात आल्या. तसेच दांडेली बस विभागाच्या अधिकाऱयांनी गावकऱयांना जादा बस सोडण्याचे लेखी आश्वासन देण्याचे सांगितले.

 यावेळी जगलबेट ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष गिरीश नाईक, ता. पं. सदस्य बळवंत देसाई, सुहास देसाई, संदीप भट, सुभाष तांबे व इतर नागरिक उपस्थित होते.

Related Stories

परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱयांचे वाढीव पेन्शनसाठी आंदोलन

Amit Kulkarni

ग्रीन झोनमध्ये 3 मे नंतर मद्यविक्रीची शक्यता

Rohan_P

बेळगाव मोर्चाला खानापुरातील युवावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार

Amit Kulkarni

महांतेशनगरात धोकादायक उघडे चेंबर

Amit Kulkarni

आतापर्यंत 13 हजार जनावरांना लम्पिस्कीन प्रतिबंधक लस

Patil_p

डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते भजन स्पर्धेचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!