Tarun Bharat

जगातील मजबूत इन्शुरन्स ब्रँडमध्ये एलआयसीचा समावेश

Advertisements

ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 2021 यादी जाहीर

वृत्तसंस्था / मुंबई

कोरोनाच्या प्रभावामुळे जगभरातील विमा कंपन्यांची ब्रॅण्ड व्हॅल्यू घटलेली आहे. दुसऱया बाजूला देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) हा एक मजबूत ब्रँड म्हणून गणला गेला आहे. प्रथमच जगातील तिसरा सर्वात मजबूत इन्शुरन्स ब्रँड ठरला आहे. यामध्ये पहिल्या 10 सर्वात मूल्यवान इन्शुरन्स ब्रँडमध्ये समावेश झाला असल्याची माहिती आहे.

लंडनमधील ब्रँड फायनान्स इन्शुरन्सच्या 2021 च्या रँकिंगच्या तुलनेत एलआयसी ब्रँडचे मूल्य हे 64,875 कोटी रुपयावर राहिले असून सदरचे स्थान हे 13 नंबरवरुन कमी होत 10 नंबरवर आल्याची नेंद केली आहे.

ब्रँडच्या संदर्भात चीनचा पिंगऐन प्रथम स्थानी राहिला असून त्याचे मूल्य 4,479 कोटी डॉलर राहिले आहे. प्राप्त अहवालानुसार बुधवारी जगातील पहिल्या 100 मूल्यवान ब्रँडचे मूल्य हे 6 टक्क्यांनी घसरले असल्याचीही माहिती आहे. यामध्ये 2020 रोजी मूल्य 462.4 अब्ज डॉलर होते. जे सध्या 433 अब्ज डॉलरवर राहिले आहे.

32 कोटीहून अधिक पॉलिसीज एलआयसीच्या देशातील 32 कोटीपेक्षा अधिक पॉलिसीज असून 13 लाखापेक्षा अधिक एजंट आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कंपनीचे नेटवर्क आहे. कंपनी लवकरच आयपीओ आणण्याची योजना आखत आहे.

Related Stories

निर्मितीत भारत दुसरा मोठा देश

Patil_p

सेन्सेक्सची तेजीची घोडदौड सुरुच

Patil_p

हॉनरची दोन नवी स्मार्ट घडय़ाळे बाजारात

Patil_p

टोयोटा किर्लोस्करची इंडसइंडशी भागीदारी

Patil_p

मुख्य कंपन्यांच्या बाजारीमूल्यात 92,130.59 कोटीने वाढ

Patil_p

शेअरबाजारात वर्षातील पहिली मोठी पडझड

Patil_p
error: Content is protected !!